स्त्री रोग व प्रसुती विभाग – प्रसूतीपश्चात डिस्चार्ज वेळीच्या सूचना

प्रसूतीपश्चात डिस्चार्ज वेळीच्या सूचना:-
  • 🕝 आठ दिवसानंतर दवाखान्यात तपासणीस यावे.
  • 🕝 दिलेली औषधे नियमित घ्यावीत.
  • 🕝 उकळून थंड केलेले पाणी प्यावे.
  • 🕝 समतोल आहार घ्यावा. पालेभाज्या व फळे यांचा आहारात समावेश करावा. तिखट व तेलकट पदार्थ खाणे टाळावे.
  • 🕝 उपवास करू नये.
  • 🕝 अती शारीरिक श्रम टाळावेत.
  • 🕝 हलका व्यायाम करावा.
  • 🕝 लांबचा प्रवास टाळावा व जड वस्तू उचलणे टाळावे.
  • 🕝 वैयक्तिक स्वच्छता ठेवावी
  • 🕝 बाळाला पहिले सहा महीने फक्त आईचे दूधच पाजावे
  • 🕝 प्रसूतीपश्चात सहा आठवड्यानंतर फेर तपासणीस यावे
खालील तक्रारी /लक्षणे असल्यास तात्काळ हाॅस्पीटलशी संपर्क साधावा:-
  • 🕝ताप
  • 🕝 उलट्या होणे.
  • 🕝 अंगावरून अती रक्तस्त्राव होणे.
  • 🕝 दुर्गंधीयुक्त सफेद स्त्राव अंगावरून जाणे.
  • 🕝 ओटीपोटात दुखणे.
  • 🕝 लघवी/संडासला त्रास होणे.
  • 🕝 भूक मंदावणे.