Orthopaedics

डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमधील अस्थीरोग विभाग हा ‘रुग्णसेवा, ज्ञानदान, समाजसेवा व संशोधन’ या चतुसुत्रीचा अवलंब करून अधिकाधिक चांगली सेवा देत कार्यरत आहे. या विभागातील अनुभवी व कुशल डॉक्टर रूग्णांना व्याधीमुक्त व स्वावलंबी बनवण्यासाठी अहोरात्र झटत असतात. हाड, सांधे आणि विविध प्रकारच्या स्नायूंच्या संबंधित आजारांवर या विभागात उपचार होतात.

अस्थीरोग विभागाद्वारे मणक्याचे आजार, स्पोर्ट्स इंजुरी, लहान मुलांचे व्यंग, जॉईंट रिप्लेसमेंटच्या विशेष ओ. पी. डी. चालवल्या जातात. विशेष म्हणजे दर शुक्रवारी स्पाईन फौंडेशन मुंबई व अस्थीरोग विभाग ह्यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मणक्याचे आजार असणाऱ्या रुग्णांकरिता ओ. पी. डी. चालवली जाते. यातील गरजू रुग्णांचे विनामूल्य ऑपरेशन देखील केले जाते. या उपक्रमाचा आत्तापर्यंत शेकडो रुग्णांनी लाभ घेतला आहे. या सेवेमुळे त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून आले आहेत.

मणक्यांच्या ऑपरेशन व्यतिरिक्त जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी तसेच दुर्बिणीद्वारे केलेल्या ऑपरेशनमुळे बरेच रुग्ण जे मर्यादित हालचाल करीत होते ते आता वेदनारहित जीवन जगत आहेत. अॅक्सिडेंट व फ्रॅक्चर यांचे उपचार म्हणजे तर अस्थीरोग विभागाचे सगळ्यात महत्त्वाचे कार्य! परदेशात शिकून कौशल्य आत्मसात केलेल्या डॉक्टरांच्या माध्यमातून कित्येक पेशंट उपचार घेऊन सर्वार्थाने आपल्या पायावर उभे राहिले आहेत.

रुग्णांना उत्तम सेवा देण्यासाठी अस्थीरोग विभाग अत्युच्च दर्जाच्या व अद्ययावत यंत्रसामग्रीने सज्ज आहे. विभागाचे लॅमिनार एअरफ्लो असलेले ऑपरेशन थिएटर म्हणजे त्याचा’आत्मा’! त्याच बरोबर अत्युच्च दर्जाचा सी आर्म, ऑपरेशन टेबल, जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी तसेच ऑर्थोस्कोपीची अद्ययावत यंत्रसामग्री यांच्या सहाय्याने रुग्णांना जास्तीत जास्त चांगले उपचार देता येतात. शस्त्रक्रिया व त्यापुढील उपचारासाठी अद्ययावत फिजीओथेरपी व अचूक निदानासाठी रेडिओलॉजी विभागाचे महत्वपूर्ण योगदान यात मिळत आहे.

पदवीपूर्व व पदव्युत्तर विध्यार्थ्यांकरिता नेहमीच्या ज्ञानदानाच्या कार्यव्यतिरिक्त बाहेरील विशेष शिक्षकाद्वारे अस्थीरोगाशी संबंधित तसेच क्वचित अस्थीरोगाव्यतिरिक्त विषयांवर व्याख्याने महिन्यातून एकदा आयोजित केली जातात. या विभागातील सर्व शिक्षक आपले कौशल्य वाढविण्याकरिता राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय फेलोशिप, कार्यशाळा व परिषदांना उपस्थित राहून स्वतःला अद्ययावत ठेवतात. विभागातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अनेक राष्ट्रीय जर्नलमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. तसेच विविध कॉन्फरन्स मधून प्राध्यापकांनी व्याख्याने दिली असून विद्यार्थ्यांनी शोधनिबंध सादर केले आहेत.

हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णांना वेदनारहित व स्वावलंबी जीवन जगण्यासाठी मदत करणारा विभाग अशी अस्थीरोग विभागाची ओळख निर्माण आहे. रुग्णसेवेचे हे कार्य असेच भविष्यातही अधिक चांगल्या पद्धतीने, आधुनिक सुविधांसह चालू ठेवण्याकरिता अस्थीरोग विभाग कटिबद्ध आहे!!

डॉ. एस. ए. लाड

विभाग प्रमुख व प्रोफेसर

अस्थिरोग विभाग