Pediatrics

  • Marathi
  • English

बालरोगविभाग

डॉ .डी. वाय. पाटील रुग्णालय आणि संशोधन संस्था, कदमवाडी, कोल्हापूर येथे बालरोग विभाग रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण, आणि संशोधन करीत आहे. सदर विभाग डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि डी. वाय. पाटील विद्यापीठ कोल्हापूर या संस्थशी संलग्न असून त्यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यरतआहे.

बाह्यरुग्ण सेवेअंतर्गत 0 ते 18 वर्षा पर्यंतच्या सर्व आजारी मुलांची तपासणी व उपचार केले जातात. तसेच आजारी नसणार्‍या मुलांना निरोगी राहण्या बाबत मार्गदर्शन केले जाते. बाह्यरुग्ण विभागात येणार्‍या उलटी जुलाबाच्या रुग्णांना या विभागा मध्येच उपचार करून गरज भासल्यास अंतररुग्ण विभागात दाखल केले जाते. सकाळी नऊ ते दोन पर्यन्त सर्व बालरुग्ण तपासले जातात. दुपारी तीन ते पाच या वेळेत विशेष बालरोग तज्ञा मार्फत सेवा दिल्या जातात. या विभागा मध्येच दैनंदिन लसीकरण केले जाते. सदर रुग्णालय हे तृतीय स्तरीय संदर्भ सेवा केंद्र असल्याने गरजू बालरुग्णांना बाह्य तसेच अंतर रुग्ण विभागा मार्फत सेवा देण्यात येतात.

अंतररुग्ण विभागामध्ये नव्वद बालरुग्ण दाखल करण्याची सोया आहे. अतीगंभीर बालरुग्णांना विशेष उपचारासाठी अतिदक्षता कक्ष आहे. येथे आठ रुग्ण दाखल करता येतात. या विभागामध्ये ऑक्सीजन व अन्य अत्याधुनिक उपचार पध्यतिची सोय आहे. या विभागाममध्ये थल्यासेमिया रुग्णासाठी विशेष कक्ष असून तेथे या रुग्णांना नियमितपणे उपचार देणेत येतात.

या विभागामध्ये तेरा बालरोगतज्ञ, हृदयरोग तज्ञ, श्वसनरोग तज्ञ, रक्तविकार तज्ञ व नवजात अर्भक तज्ञ; पदव्युत्तर विद्ययारथ्या समवेत रुग्णासेवा करीत असतात. त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा अनेक गरजू रुग्णांना झाला आहे.

नवजात अर्भक अतिदक्षता विभाग नुकत्याच जन्मलेल्या आजारी बाळांना आरोग्य सेवा देता असतो. या विभागामध्ये अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध असल्याने अश्या बाळांना उच्च प्रतीच्या सेवा देणे शक्य झाले आहे. यामुळ्ये 800 ग्रॅम पेक्षा जास्त जन्मवजन असणारी अनेक बाळे सुखरूप घरी गेली आहेत.

या विभागामधील सर्व वैद्यकीय स्टाफ ग्रामीण भागामध्ये आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरामध्ये सहभागी होवून आजारी लोकांना आरोग्य सेवा देतात. या विभागामधील तज्ञ डॉक्टर नव्याने सुरू केलेल्या सिम्युलेशन लॅब विभागामध्ये प्रक्षिक्षक म्हणून अन्य डॉक्टरना प्रशिक्षण देत असतात.

बालरोग विभागामध्ये दरवर्षी सहा पदव्युत्तर विद्यार्थीना एम. डी. अभ्यास क्रमासाठी प्रवेश दिला जातो. सदर पदव्युत्तर विद्यार्थी तसेच शिक्षक वैद्यकीय संशोधणा बाबत सातत्याने कार्यमग्न असून त्यांनी केलेली संशोधने अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुस्तकामधून व नियतकालीकामधून प्रसिद्ध झालेली आहेत. या विद्यार्थ्यानी त्त्यांचे संशोधन अनेक वैद्यकीय परिषदेमधून सादर करून पारितोषिके मिळवली आहेत.

या विभागामधून उत्तीर्ण होवून बाहेर गेलेले अनेक विद्यार्थी आज चांगल्या नामांकित आरोग्य संस्था मधून बालरोग विशेष तज्ञ म्हणून काम करीत आहेत. हे विद्यार्थी नियमितपणे येथील त्यांच्या कानिठ्य सहकार्‍यांना मार्गदर्शन करीत असतात.

Department of Pediatrics, D.Y.Patil medical college Kolhapur is engaged in UG, PG teaching,training activities, community based activities,mass awareness activities and patient care activities as a tertiary care centre It cares for OPD as well as indoor sick babies including Pediatric intensive care, Neonatal intensive care activities. In addition we also have Pediatric superspecilities services in afternoon hours. Our department is lead by professor and HOD to have two more professors and three associate professors,three lecturers, three senior residents and 18 junior residents. Our senior faculty is trainer for various programmes like ACLS, BLS, NRP, PALS courses. We conduct regular school health check up, health check camps in urban and rural areas.