डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा मानसोपचार विभाग बाह्य रुग्ण व दाखल रुग्ण या दोहोंना संपूर्ण मानसिक आरोग्य सेवा प्रदान करते. क्लिनिकल मानसोपचार आणि संशोधन यामधील प्रदीर्घ अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर या विभागात प्रध्यापक म्हणून कार्यरत आहेत. एक प्रोफेसर, दोन असोसिएट प्रोफेसर व एक असीस्टट प्रोफेसर आणि दोन वरिष्ठ निवासी डॉक्टर या ठिकाणी कार्यरत आहेत.
आजच्या अत्यंत धावपळीच्या व अपेक्षांचे प्रचंड ओझे खांद्यावर असलेल्या जगात बहुसंख्य लोक प्रचंड तणावाखाली जगात आहे. या तणावातूनच नैराश्य व विविध मानसिक आजार जन्म घेत आहेत. या सर्वातून बाहेर पडण्यासाठी मानसोपचार तज्ञाची मोठी मदत होऊ शकते.
हॉस्पिटलच्या या विभागात विविध सेवा पुरवल्या जातात. यामध्ये समुपदेशन व मानसोपचार, मानसिक आजार व त्यावरील उपायांसदर्भात सल्ला, अत्याधुनिक ईसीटी मशीनद्वारे मेंदूला उत्तेजित करणे, समुपदेशन केंद्र आदी सुविधा या विभागाकडून पुरवल्या जातात. बाह्यरुग्ण विभागात स्किझोफ्रेनिया, वर्तणुकीत बदल, स्मृतीभ्रंश किवा डीमेंशिया,मुलांमधील वर्तणुकीच्या समस्या, अनिद्रा, नैराश्य, चिंता, लैंगिक समस्या, व्यसनमुक्ती आदीवर तपासणी, सल्ला व मार्गदर्शन केले जाते.
सध्या कोविड महामारीच्या या संकट कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाचे मानसिक आरोग्य उत्तम राखणे आवश्यक आहे. असे रुग्ण तसेच विविध आजारांसाठी अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेले रुग्ण यांच्यासह हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्णांचे समुपदेशन व तणाव व्यवस्थापन यांचे धडे आमच्या विभागाकडून दिले जातात. त्यामुळे रुग्ण मानसिकदृष्ट्या सक्षम होऊन वैद्यकीय उपचारांना सकारात्मक प्रतिसाद मिळून तो लवकर बरा होण्याची शक्यता वाढते.
पदवीपूर्व व पद्व्युत्तर प्रशिक्षण व अभ्यासक्रम राबवले जातात. तसेच विविध संशोधन प्रकल्पांमध्येही आमचे प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी होतात. मेंदूत उत्तेजन, वर्तणूक, व्यसनाधीनता आणि नैराश्यातून होणाऱ्या आत्महत्या या क्षेत्रामध्ये सतत संशोधन कार्य, नवनवे प्रयोग विभागाकडून सुरु असतात.
- डॉ. देवव्रत हर्षे
- विभाग प्रमुख व प्रोफेसर
- मानसोपचार विभाग