Pulmonary Medicine

डॉ. डी . वाय. पाटील हॉस्पिटलचा श्वसन (छातीचे) रोग व क्षयरोग (टी.बी.) हा एक महत्वाचा विभाग आहे. शैक्षणिक कार्य, रुग्णांची देखभाल, उपचार पद्धती याद्वारे या विभागाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या विभागात दोन तज्ञ डॉक्टर व प्रोफेसर कार्यरत असून निवासी डॉक्टर व प्रशिक्षणार्थी डॉक्टर यांच्या मदतीने ते ही सेवा देतात.

रुग्णालयाच्या अन्य विभागांच्या मदतीने (उदा. मेडिसिन, सर्जरी, ओर्थोपेडीक) वेळोवेळी आमच्या विभागाचे कार्य सुरु असते. सध्या सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत ओपीडी विभाग चालू असतो. यामध्ये छातीचे रोग, अन्य विभागाकडून आलेले संदर्भीय रुग्ण, श्वसन कार्यक्षमता चाचणी (पीएफटी), ब्रोन्कोस्कोपी अश विविध तपासणी केल्या जातात.

वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांसाठी लेक्चर्स, प्रात्यक्षिके व बेडसाईड शिक्षण या विभागाकडून दिले जाते आहे. आयसीयू मध्ये दाखल असलेल्या रुग्णाच्या श्वसनशि संबंधित प्रश्नावर आमच्या विभागाचे तद्न्य डॉक्टर सल्ला देतात. त्याचप्रमाणे गरजेनुसार ब्रोन्कोस्कोपी, आयसीडी व पीएफटी अशा प्रक्रिया करतात. हॉस्पिटलच्या परिसरातच सुसज्ज व अत्याधुनिक असी सिम्युलेशन लाब कार्यरत असून त्याचा खूपच मोठा फायदा होत आहे, या ठिकाणी डॉक्टर्स व वैद्यकीय विद्यार्थी यांना विविध समस्या व त्यावरील उपाययोजना याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळत असल्याने ब्रोन्कोस्कोपी सारख्या विविध प्रक्रियांचे अनुभवाधारित शिक्षण देता येते.

सध्या कोरोनाने सर्वत्र हाहाःकार उडवला असून वैद्यकीय क्षेत्राची आवश्यकता व महत्व खूपच वाढले आहे. या स्थितीत कोरोनाविरोधातील या लढ्यात आमचा विभागही खंबीरपणे कार्य करत आहे. आयसीयूमधील रुग्ण व अन्य कोरोनाबाधित रुग्ण यांना तपासणे, सल्ला – मार्गदर्शन देणे अशी महत्वाची कार्य आमचे डॉक्टर्स करत आहेत.

विविध शासकीय योजनाची प्रभावीपणे अंमलबजावणी करून क्षयरोगाचे उच्चाटन करण्यासाठी आमचा विभाग मेहनत घेत आहे. सुधारित क्षय रोग निर्मुलन विभाग, राष्ट्रीय क्षयरोग निर्मुलन विभाग या विभागांच्या सहकार्याने आमचा विभाग कार्य करत आहे. रुग्णांना सल्ला व मार्गदर्शन देणे व एमडीआर पेशंटचे औषधोपचार करणे व त्याचे व्यवस्थापन करणे अशी कार्ये आमच्या विभागातील डॉक्टर करतात.

 

  • डॉ. मोहन पोतदार
  • विभाग प्रमुख व प्रोफेसर
  • श्वसनरोग व क्षयरोग