डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पीटलमध्ये दाखल होणाऱ्या विविध रुग्णाच्या आजारांचे अचूक निदान करण्यामध्ये रेडीओ डायग्नोसीस विभाग अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहे. तज्ञ डॉक्टर्सच्या माध्यमातून अचूक निदान, रुग्णांना उत्कृष्ट क्लिनिकल केअर सेवा, संशोधन व नाविन्यपूर्ण प्रयोग आणि शिक्षण व मार्गदर्शन या माध्यमातून हा विभाग कार्यरत आहे.
आमची उपर्युक्त उद्दिष्टे निर्धारित वेळेत, माफक किमतीत अचूक निदान करण्याचा दृष्टीकोन त्याचबरोबर रुग्ण, प्रशिक्षणार्थी व आरोग्य कर्मचाऱ्याचे प्रशिक्षण या माध्यमातून दीर्घकालीन उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यात आम्ही नक्कीच यशस्वी होऊ याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.
आमचे अनुभवी व तज्ञ प्राध्यापक हे आमच्या विभागाचा कणा आहेत. आमची कुशल विद्याशाखा अचूक निदान करून संदर्भित डॉक्टरांना त्याबाबतचा अहवाल देते. रुग्णांवर पुढील उपचाराची दिशा ठरवण्यासाठी याचा मोठा फायदा होतो. रविवार वगळता इतर सर्व दिवस रुग्ण तपासणी केली जाते, मात्र निवासी डॉक्टर व पथकाकडून सुटीच्या दिवशीही आपत्कालीन सेवा दिली जाते.
आमचा विभाग अत्याधुनिक यंत्र सामग्रीने सुसज्ज असून त्यामुळे अचूक व कमी वेळात रोगनिदान करणे शक्य होते. यामध्ये अद्ययावत क्ष-किरण विभाग, संगणकिकृत रेडीओग्राफी, कलर डॉपलसह युएसजी, मॅमोग्राफी, १२८ स्लाईस सीटी स्कॅन आणि ३ टेस्ला एमआरआय मशीनचा समावेश आहे. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल व वैद्यकीय संदर्भित पुस्तकांनी सज्ज असे ग्रंथालयही याठिकाणी उपलब्ध आहे. आमच्या विभागात विशेष संग्रहालय असून त्यात विविध विभागातील विशेष प्रकरणाच्या संदर्भ फाईल्स जतन व संग्रहित करून ठेवण्यात आल्या आहेत. या विभागता उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या असून त्यात वायफाय कनेक्टीव्हीटीसह एलसीडीयुक्त डेमो रूमचा समावेश आहे.
रेडीओलॉजी विभागात रुग्णाचे रोग निदान झाल्यावर त्यासंबंधित प्रतिमा व रिपोर्ट सर्व सलग्न विभाग, अति दक्षता विभाग आणि वार्डमध्ये चित्र संग्रहण आणि संप्रेषण प्रणालीद्वारे (पीएसीएस) तात्काळ उपलब्ध करून दिले जातात. या विभागात कार्यरत असलेले डॉक्टर, कन्सलटंट क्षेत्रातील अनुभवी तज्ञांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषद, कार्यशाळा यामध्ये सहभागी होऊन आपले ज्ञान व कौशल्य अद्ययावत करत असतात.
रेडीओलॉजी विभागात संशोधन कार्यही निरंतर सुरु असते. प्राध्यापक, निवासी डॉक्टर व वैद्यकीय विद्यार्थी संशोधन प्रकल्पाच्या माध्यमातून एखाद्या समस्येचे समाधान शोधण्याचा प्रयत्न करतात. शिक्षण व नवे ज्ञान अर्जित कारणासाठी वैशिष्ट्यपूर्ण व दुर्मिळ केसवर नियोजनबद्ध चर्चा होते. कर्मचाऱ्यांवरील कामाचा अतिरिक्त ताण कमी व्हावा यासाठी हास्य वर्ग, योगा वर्ग असे उपक्रम राबवले जातात.
रुग्णसेवेच्या क्षेत्रात रेडीओलॉजी विभागाचे महत्व व मागणी सतत वाढतच राहणारी असून त्यादृष्टीने सतत स्वत:ला अपडेट करण्याचे काम आमच्या सहकाऱ्याकडून सुरूच राहील. आमचा विभाग भूतकाळापासून अनेक गोष्टी शिकत राहील, त्यातून वर्तमान सुधारण्यासाठी सतत प्रयत्नशील राहून भविष्यात अधिकाधिक उत्तम दर्जाच्या सेवा देण्याचा प्रयत्न करेल.
- डॉ. नितीन वाधवाणी
- विभाग प्रमुख व प्रोफेसर
- रेडीओलॉजी व क्ष-किरण विभाग