जागतिक महिला दिनानिमित्त सोमवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट कदमवाडी येथे जागतिक महिला दिनानिमित्त सोमवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘choose to challenge’ ही यावर्षी महिला दिनाची थीम आहे. महिलांनी स्वतःसह अन्य महिलावरही अत्याचार होऊ नये याची काळजी घ्यावी. सर्व आव्हानांचा सक्षमतेने सामना करावा असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. वैशाली गायकवाड यांनी केले. महिला दिनानिमित्त हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनी व महिला कर्मचाऱ्यांनी फ्लॅश मॉबने रंगत आणली. रंग दे बसंती व उडी उडी जाय या गीतावर उत्कृष्ट सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर आयोजित ‘फ़ेलिसिएटीग द वूमनहूड’ या कार्यक्रमात कोविड काळात कर्तव्याला सर्वाधिक प्राधान्य देत वैद्यकीय सेवेत असीम योगदान देणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन विशेष गौरव करण्यता आला. यावेळी २३० महिला कोविड योद्ध्यांना गौरवण्यात आले. या वैद्यकीय अधिक्षक डॉ. वैशाली गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. आपल्या दैनंदिन कामकाजात आपण स्त्री आहे हे विसरून जातो. आता स्त्रिया कोणत्याही क्षेत्रात कमी नसून स्त्रिया आत्मनिर्भर झाल्यामुळे याचा अभिमान वाटतो. समाजात कोणत्याही क्षेत्रात एखाद्या महिलेवर अत्याचार झाला तर त्याला प्रतिकार केला पाहिजे. हा अत्याचार प्रत्येकवेळी पुरुषच करतो असे नाही. तसेच केवळ अत्याचारित महिलेनेच प्रतिकार न करता सर्वच महिलांनी त्यासाठी पुढे आले पहिजे. स्त्रीने स्त्रीशि मैत्रीणीप्रमाणे वागावे, तिला शत्रू मानू नये असे आवाहन त्यांनी केले. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात डॉ. गायकवाड यांनी उपस्थित महिलांना आव्हान स्वीकारायची शपथ दिली. मेडिकल कॉलेजच्या उपप्राचार्या डॉ. आशालता पाटील यांनी महिलांनी आपल्यासमोर असलेली आव्हाने स्वीकारून यशस्वी वाटचाल केली पाहिजे. प्रत्येक महिला ही शक्तीशाली आहेच, या शक्तीचा योग्य वापर केला पाहिजे. जगाचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे, यासाठी आपणच पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. नीलिमा शहा, डॉ. संगीता देसाई, डॉ. वसुधा सावंत, डॉ. कल्पना कुलकर्णी, डॉ. अनिता अडनाईक, यांच्यासह महिला डॉक्टर्स, नर्स तसेच इतर कोविड योध्या महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. मोफत तपसणीला उत्स्फूर्त प्रतिसाद महिला दिनानिमित्त सोमवारी हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग विभागाच्यावतीने महीलासाठी पॅप स्मियर (गर्भाशय मुखाची तपासणी), कोल्पोस्कोपी (गर्भाशय पिशवीची दुर्बिणीद्वारे तपासणी), स्तन परीक्षण व प्रसुतीपुर्व या चार तपासनण्या मोफत उपलब्ध करण्यात आल्या होत्या. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.