डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलतर्फे कोल्हापूर शहरात विविध ठिकाणी मोफत तपासणी व उपचार शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पीटलतर्फे मोफत तपासणी व उपचार शिबीर डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलतर्फे कोल्हापूर शहरात विविध ठिकाणी मोफत तपासणी व उपचार शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात पोटाचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, थायरॉइड, स्त्रियांचे आजार, हाडे व सांधे दुखीचे आजार, लहान मुलांचे आजार, त्वचा रोग, कान, नाक, घसा व डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, रक्तदाब, डायबेटीस, त्याचप्रमाणे मलेरिया, डेंग्यू, चिकन गुनिया अशा साथीच्या रोगांवरही मोफत उपचार व तपासणी करण्यात येतील. सोमवार दि. २१ डिसेंबरपासून या शिबिराला प्रारंभ झाला आहे. बुधवार २३ रोजी महावीर दवाखाना विक्रमनगर व गुरुदेव विद्यानिकेतन फुलेवाडी येथे हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. गुरुवार २४ रोजी जेष्ठ नागरिक संघ हॉल, चव्हाण कॉलनी साळोखे नगर व सर्वपल्ली राधाकृष्ण विद्यामंदिर राजेंद्र नगर, शनिवार २६ रोजी शिवगंगा कॉलनी हॉल, आपटेनगर व राजे संभाजी हॉल, फुलेवाडी रिंगरोड, सोमवार २८ रोजी प्राथमिक शाळा राजोपाध्ये नगर, सानेगुरुजी वसाहत या ठिकाणी हे मोफत शिबीर होणार आहे. तरी गरजुनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील, उपाध्यक्ष पालकमंत्री सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, डीन डॉ. आर. के. शर्मा, वैद्यकीय अधीक्षका डॉ. वैशाली गायकवाड यांनी केले आहे.