बुधवार दि. ३ मार्च रोजी ‘जागतिक श्रवण दिन’ आयोजित करण्यात आला आहे.

डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, कदमवाडी येथे बुधवार दि. ३ मार्च रोजी ‘जागतिक श्रवण दिन’ आयोजित करण्यात आला आहे. श्रवण दोषाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी ‘श्रवण सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे.

बहिरेपणा व श्रवण दोष कमी करण्यासाठी घ्यायची दक्षता व कानाचे आरोग्य सुधारण्यासाठी उपाययोजनांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून दरवर्षी ३ मार्चला ‘जागतिक श्रवण दिन’ साजरा केला जातो. कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या कान, नाक व घसा रोग विभागाच्यावतीनेही या दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

हॉस्पिटलमध्ये ३ मार्च रोजी जागतिक श्रवण दिनानिमित्त श्रवण दोष जाणवणाऱ्या रुग्णांची मोफत तपासणी केली जाणार आहे. सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत ही मोफत तपासणी उपलब्ध असेल. त्याचबरोबर ३ मार्च ते १० मार्च या कालावधीत ‘श्रवण सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. या कालावधीत गरजू रुग्णांना सवलतीच्या दरात श्रवण यंत्रे मिळणार असल्याची माहिती कान, नाक व घसा रोग विभाग प्रमुख डॉ. राजश्री माने यांनी दिली.