स्त्री रोग व प्रसुती विभाग – गरोदर स्त्रियांनी घेण्याची काळजी
गरोदर स्त्रियांनी घेण्याची काळजी:- - 🕝 नियमित तपासणीसाठी यावे
- प्रथम तपासणी – पाळी चुकल्यानंतर 1 ते 2 महिन्यात.
- तीन ते सात महिन्यापर्यंत प्रत्येक महिन्यात एकदा.
- आठव्या महिन्यात – 15 दिवसांतून एकदा
- नवव्या महिन्यात दर आठवड्याला एकदा.
- 🕝 समतोल आहार घ्यावा. (दूध, फळे, पालेभाज्या, कडधान्ये, डाळी, सॅलेड).
- 🕝 मांसाहरी असल्यास अंडी, मासे, चिकन, मटण घ्यावे.
- 🕝 दिलेली औषधे नियमित घ्यावीत. डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत.
- 🕝 उपवास करू नये.
- 🕝 सोनोग्राफी तपासणी किमान चार वेळा करून घ्यावी
- पहिली तपासणी:- पाळी चुकल्यापासून आठ आठवड्यापर्यंत
- दुसरी तपासणी:- 11 ते 14 आठवडे
- तिसरी तपासणी:- 18 ते 22 आठवडे
- चैथी तपासणी:- नवव्या महिन्यात.
- 🕝 योग्यत्या रक्त व लघवीच्या तपासण्या कराव्यात. (हिमोग्लोबीन, एच.आय.व्ही., हिपॅटायटिस – बी, शुगर इत्यादी)
- 🕝 धनुर्वात प्रतिबंधक लस सहाव्या व सातव्या महिन्यात घ्यावी
- 🕝 लांबचा प्रवास आणि जड वस्तू उचलणे टाळावे.
- 🕝 रोज स्वच्छ स्नान करावे व सैलसर कपडे घालावीत.
- 🕝 गरोदरपणात सुरूवातीचे तीन महिन्यात व शेवटच्या दोन महिन्यात शारीरिक संबंध टाळावा.
खालील लक्षणे/तक्रारी असल्यास डाॅक्टरांकडे त्वरित जावे:- - 🕝 पोटात दुखू लागल्यास
- 🕝 अतिशय जास्त उलट्या होत असल्यास
- 🕝 अंगावर रक्तस्त्राव झाल्यास
- 🕝 अंगावर पाणी जाऊ लागल्यास
- 🕝 बाळाची हालचाल कमी जाणवल्यास
- 🕝 झटके येत असल्यास
- 🕝 पायावर व चेह-यावर सूज येत असल्यास
- 🕝 डोके दुखणे व डोळ्यांना दिसेनासे झाल्यास
प्रसुतीपश्चात घ्यावयाची काळजी:- - 🕝 प्रसुतीनंतर दोन तासात स्तनपान सुरू करावे.
- 🕝 पहिल्या दोन दिवसातील पिवळसर दूध बाळासाठी अत्यावश्यक आहे.
- 🕝 बाळाला दर दोन तासांनी स्तनपान द्यावे व नंतर ढेकर काढावी.
- 🕝 आईच्या दुधाशिवाय बाळास पहिले सहा महिने काहीही देऊ नये.
टाक्यांची काळजीः- - 🕝 टाके स्वच्छ ठेवावेत.
- 🕝 आंघोळीनंतर, लघवी व संडासला जाऊन आल्यानंतर टाके, पाणी व डेटाॅलने धुवावेत व मलम लावावे.
- 🕝 पालथी मांडी घालावी.
- 🕝 स्वच्छ पॅड्स वापरावेत.
सिझेरियन शस्त्रक्रिया झाल्यास जखमेची स्वच्छता ठेवावी.
संतती नियमन:- - 🕝 दोन मुलांमध्ये किमान तीन वर्षाचे अंतर असावे.
- 🕝त्यासाठी गर्भनिरोधक साधने (निरोध, तांबी, काॅपर्टी, गर्भनिरोधक गोळ्या) डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावे.