पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या संशोधन व प्रशिक्षण कार्यशाळेच्या (कोर्ट-२०२१) उद्घाटन दि. १८ मार्च २०२१

संशोधना इतकेच सादरीकरणही महत्वाचे

वैद्यकीय क्षेत्रातील विविध शाखाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संशोधन व सादरीकरण कौशल्ये आत्मसात असणे अत्यंत आवश्यक आहे. उत्तम सादरीकरणाच्या माध्यमातूनच आपले संशोधन जगासमोर येऊ शकते असे प्रतिपादन डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राकेशकुमार मुदगल यांनी केले. पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या संशोधन व प्रशिक्षण कार्यशाळेच्या (कोर्ट-२०२१) उद्घाटन समारंभात ते बोलत होते. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतीवर्षी संशोधन व प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली जाते. यावर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर महिनाभर उशिरा १८ मार्च रोजी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, कदमवाडी येथे झालेल्या या कार्यशाळेचे कुलगुरु राकेशकुमार मुदगल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन झाले. यावेळी प्र कुलगुरू डॉ. शिम्पा शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, अधिष्ठाता डॉ. आर. के. शर्मा, उपप्राचार्या डॉ. आशालता पाटील, संशोधन संचालक डॉ. सी. डी. लोखंडे, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या डॉ. सुहासिनी राठोड, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड, कोर्ट २०२१चे सचिव डॉ. बी. सी. पाटील यांच्यासह प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ मार्फत हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्यविषयक सोयी सुविधा माफक दरात पुरवल्या जातात. कोविड काळात डी. वाय. पाटील हॉस्पिटलने सरकारी यंत्रणेच्या बरोबरीने आरोग्य सुविधा पुरवल्या होत्या. विद्यापीठ शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात भरारी घेत असून त्याचाच एक भाग म्हणून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. होते. यावेळी प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाचे तसेच पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या १७५ विद्यार्थ्यांनी व एमएससी नर्सिंगच्या १५ विद्यार्थ्यांनी आपण करत असलेल्या संशोधनाचे सादरीकरण केले. यामध्ये उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विद्यापीठाकडून गौरव केला जाणार आहे. विद्यार्थी व शिक्षकांमध्ये संशोधनाला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल व अधिष्ठाता डॉ. राकेशकुमार शर्मा यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संशोधन क्षेत्रातील सादरीकरणाचे महत्व सांगितले. या व्यासापिठाचा योग्य उपयोग करून संशोधन क्षेत्रात नावलौकिक मिळवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या उपक्रमाला विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.